पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI या संघटनेवर केंद्र सरकारनं ५ वर्षांची बंदी घातली आहे. मागील काही दिवसांपासून PFI संघटनेच्या कार्यालयांवर केलेल्या छापेमारीनंतर तपास यंत्रणांच्या शिफारशीनंतर मोदी सरकारनं हा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं भाजप नेते राम कदम, किरीट सोमय्यांनी स्वागत केलंय.